- वीजदरात ५० ते ६० टक्क्यांची वाढ
- दरवाढी विरोधात हेस्कॉमला निवेदन देण्याचा काजू व्यवसायिकांचा निर्णय
सुळगा (हिं.) / वार्ताहर
एकीकडे राज्य सरकारने २०० युनिट पर्यंत मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला असताना निवडणूक संपताच घरगुतीसह व्यावसायिक मीटरमागे दरवाढ करण्यात आली आहे.
फ्युएल चार्जेसमधील ॲडजेस्टमेंट कॉस्टच्या नावाखाली ५० ते ६० टक्के विद्युत बिल वाढविण्यात आल्याने बिल कसे भरायचे? हा प्रश्न सर्वसामान्य नागरिक आणि व्यवसायिकांसमोर निर्माण झाला आहे. व्यवसायिकांमध्ये विशेषतः काजू व्यावसायिकांना या दरवाढीचा मोठा फटका बसला आहे. आधीच व्यवसायात आलेली मंदी आणि त्यात ही विज बिलातील दरवाढ यामुळे काजू व्यवसाय धोक्यात आला आहे. अवकाळी पावसाचा फटका आणि काजूचे घटलेले उत्पादन यामुळे व्यवसायिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
जून महिन्यात आलेल्या घरगुती विद्युत बिलात सुमारे ४०० ते ६०० रुपयांची वाढ झाली आहे. ज्या ग्राहकांचे बिल महिन्याला ६०० ते ७०० रुपये येत होते त्यांचे बिल या महिन्यात थेट हजार ते बाराशे पर्यंत पोहोचले आहे. तर व्यावसायिक विद्युत बिलातही सुमारे १५,००० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ज्या व्यावसायिकांचे बिल महिन्याला वीस हजार रुपये येत होते त्यांचे बिल या महिन्यात थेट पस्तीस हजार, तर ज्यांचे बिल महिन्याला बत्तीस हजार रुपये येत होते त्यांचे बिल या महिन्यात थेट सत्तेचाळीस हजार पर्यंत पोहोचले आहे. परिणामी हैराण झालेल्या काजू व्यवसायिकांनी उद्या सोमवारी हेस्कॉमला वीजदरवाढी विरोधात निवेदन देण्याचा निर्णय घेतला आहे.
एकंदरीत या वीज दरवाढीमुळे हेस्कॉम विरोधात ग्राहक तीव्र संताप व्यक्त करत आहेत.
1 Comments
This comment has been removed by the author.
ReplyDelete