चंदगड / प्रतिनिधी
तिलारी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये शनिवारी बुडालेल्या बेळगाव येथील सख्ख्या भावांचे मृतदेह HERF रेस्क्यू टीमच्या तब्बल दहा ते अकरा तासांच्या शोध मोहीमेनंतर रविवारी दुपारी चारच्या सुमारास सापडले.
![]() |
(फोटो व व्हिडिओ सौजन्य :बसवराज हिरेमठ HERF रेस्क्यू टीम ) |
रेहान अल्ताफ खान (वय १५ ) व मुस्तफा अल्ताफ खान (वय १२) या दोघांचे मृतदेह रविवारी दुपारी चारच्या सुमारास सापडले. हे दोघेही आपल्या आईवडिलांसोबत शनिवारी पिकनिकसाठी हाजगोळी-चाळोबा येथे तिलारी धरणाच्या बॅकवॉटर परिसरात आले होते. धरणात उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. पण शनिवारी सांयकाळी अंधार झाल्यामुळे शोध मोहीम रात्री आठ वाजता थांबविण्यात आली होती.
रविवारी सकाळी पुन्हा चंदगड व बेळगाव येथील HERF रेस्क्यू टिमने शोध मोहीम सुरू केली असता दुपारी साडेतीनच्या सुमारास रेहानचा मृतदेह सापडला त्यानंतर अर्ध्या तासाने त्याच्या भावाचा मृतदेह सापडला. त्यानंतर चंदगड येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून दोघाचेही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
-कॅमेऱ्याच्या सहाय्याने शोधले मृतदेह -
हाजगोळी-चाळोबा येथे रविवारी सकाळपासूनच घटनास्थळी अल्ताफ खान यांच्या नातेवाईकांनी गर्दी केली होती. बेळगाव येथील HERF रेस्क्यू टीमच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे व चंदगडच्या टीमच्या सहकार्यामुळे ३० ते ४० फूट पाण्यातील मृतदेह कॅमेऱ्याच्या सहाय्याने शोधण्यात यश आले. या शोध मोहिमेत HERF रेस्क्यू टीमचे बसवराज हिरेमठ, पद्मप्रसाद हुळळी, अभिषेक येल्लूर, राजू टक्केकर तसेच चंदगड पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक ए. एस. करंडे अमोल पाटील, किल्लेदार, भदर्गे आणि सहकाऱ्यांचा सहभाग होता .
- या बातमीचा व्हिडीओ पहा -
👇
0 Comments