- हॉस्पिटलमधील समस्या, वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या निवास व्यवस्थेची केली पाहणी
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव येथील बीम्स हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजला आज लोकायुक्त अधिकाऱ्यांनी अचानक भेट दिली. या भेटी दरम्यान बीम्समधील समस्या, वैद्यकीय विद्यार्थ्यांची निवास व्यवस्था आणि सरकारच्या निर्देशानुसार इतर समस्यांची पाहणी केली. यावेळी लोकायुक्त एसपी हनुमंतराय यांच्या नेतृत्वाखाली २० हून अधिक लोकायुक्त अधिकाऱ्यांनी बीम्सचे संचालक डॉ.अशोककुमार शेट्टी यांच्या दालनात कागदपत्रांचीही पडताळणी केली.
मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये औषध खरेदीतील अनियमितता, कर्तव्य बजावण्यात डॉक्टरांचे दुर्लक्ष, बाळंतिणींचा मृत्यू आदींसह अनेक बाबींची त्यांनी माहिती घेतल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत माहिती देताना बीम्सचे संचालक डॉ. अशोक पट्टणशेट्टी म्हणाले, लोकायुक्त विभागाकडून सरकारी विभागांना भेटी देण्यात येत आहेत, त्यानुसार त्यांनी बीम्सलाही भेट दिली आहे. या भेटीत त्यांनी वित्त विभाग, सुपर स्पेशालिटी स्टाफ आणि हॉस्पिटलमधील समस्यांची माहिती घेतल्याचे त्यांनी सांगितले.
0 Comments