- दोन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू
विजयपूर / दिपक शिंत्रे
विजयपूर जिल्ह्यातील देवरहिप्परगी येथील बसवण बागेवाडी रस्त्यावर काल रात्रीच्या वेळी कार व मोटरसायकल यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघात मोटरसायकल वरील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. आरीफ वड्डोडगी (वय ३५) व महबूबसाब करजगी (वय ६५) यांचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीस्वार हे हिप्परगी येथून देवऱहिप्परगीकडे येत होते. तर बसवण बागेवाडीकडे जात असलेल्या कारला समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात घडला असून कारसह चालक फरार झाला आहे
या घटनेच्या ठिकाणी देवऱहिप्परगी पोलीस दाखल होऊन अधिक तपास करीत कार आणि चालकाच्या शोध घेण्याची कारवाई करत आहेत. देवऱहिप्परगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
0 Comments