- महिला आणि बालविकास विभागाच्या सहकार्यातून अभ्यासपूर्ण सत्र
बेळगाव / प्रतिनिधी
महिला आणि बालविकास विभागाच्या सहकार्याने रोटरी क्लब ऑफ बेळगांव दर्पण यांनी अंगणवाडी शिक्षकांसाठी प्रभावी ताण व्यवस्थापन या विषयावर एक अभ्यासपूर्ण सत्र आयोजित केले होते.
यामध्ये प्रमुख अतिथी तथा वक्त्या आरटीएन. डॉ. स्फुर्ती मास्तीहोळळी यांनी मार्गदर्शन करताना तणावपूर्ण दिवस सहजपणे कसा घालवायचा याचे व्यावहारिक तंत्र सांगितले. तसेच सर्वांना परस्परसंवादी उपक्रमांद्वारे सहभागी करून घेतले. हे सत्र उत्साही होते आणि त्यामध्ये शिक्षकांनी मनापासून भाग घेतला. ज्यामुळे शिक्षकांसाठी तो खरोखरच समृद्ध करणारा अनुभव बनला. या मार्गदर्शन सत्रात ७० हून अधिक अंगणवाडी शिक्षिका सहभागी झाल्या होत्या.
रोटरी क्लब ऑफ बेळगांव दर्पणच्या अध्यक्षा आरटीएन. रूपाली जनाज यांनी स्वागत केले. यावेळी संयोजक आरटीएन. उर्मिला गनी, आरटीएन. सविता वेसणे, सीडीपीओ विभागाच्या वरिष्ठ पर्यवेक्षिका श्रीमती ज्योती जंगलप्पागवदार आणि श्रीमती राजश्री सौदी उपस्थित होत्या. संंयोजक आरटीएन. उर्मिला गनी यांनी आभार मानले. आरटीएन. अॅड. दिव्या मुदीगौदर यांनी सूत्रसंचालन केले.
0 Comments