बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव ग्रामीण मतदार संघातील सुळगा (उ.) परिसरात सेतू वजा बंधारा (ब्रिज कम बॅरेज) बांधण्यात येणार आहे. महिला - बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या सूचनेवरून काँग्रेस युवा नेते मृणाल हेब्बाळकर यांनी शनिवारी स्थानिक नागरिकांसमवेत सुळगा गावाला भेट देऊन जागेची पाहणी केली.
बेळगाव ग्रामीणचे आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या विशेष प्रयत्नातून सुळगा परिसरासाठी सेतू वजा बंधारा मंजूर झाला असून भूमिपूजनाने लवकरच कामाला सुरुवात करण्यात येईल, असे मृणाल हेब्बाळकर यांनी सांगितले. यावेळी सहाय्यक अभियंता माळगी, ग्रामपंचायत माजी अध्यक्ष संजय पाटील व अन्य उपस्थित होते.
0 Comments