• राज्यातील ९ विद्यापीठे बंद करण्याच्या निर्णयाचा केला निषेध 

बेळगाव / प्रतिनिधी 

राज्यातील ०९ विद्यापीठे बंद करण्याच्या राज्य सरकारच्या धोरणाचा निषेध करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आज बेळगावमध्ये निदर्शने केली.

राज्यातील ०९ विद्यापीठे बंद करण्याच्या राज्य सरकारच्या धोरणाचा निषेध करत, आज बेळगावीतील राणी चेन्नम्मा सर्कल येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने निदर्शने केली. विद्यापीठांमध्ये शिक्षण घेऊन येणारे विद्यार्थी देशाच्या विकासात योगदान देतात. विद्यापीठांना आवश्यक संसाधने पुरवणे हे सरकारचे कर्तव्य आहे. मात्र, आर्थिक आणि पायाभूत सुविधांच्या न देत विद्यापीठांना बंद करणे निषेधार्ह आहे.

राज्य सरकारचे धोरण शिक्षणविरोधी आहे. शैक्षणिक क्षेत्रात राजकारण न आणता शिक्षण तज्ञांचा सल्ला घ्यावा. विद्यापीठे बंद करणाऱ्या सरकारने आपला निर्णय मागे घ्यावा. सरकारने विद्यापीठांना आवश्यक निधी आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी करण्यात आली.

यासंदर्भातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारला सादर करण्यात आले.