- नीरज डोनेरिया विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे राष्ट्रीय प्रवक्ते
बेळगाव / प्रतिनिधी
हिंदू समाजाच्या उन्नतीसाठी सरकारने आपल्या अस्तित्वातील मंदिरे मुक्त करावीत. प्रत्येक कुटुंबात तीन मुलांना जन्म देऊन हिंदू समाजाची लोकसंख्या वाढवणे आवश्यक आहे असे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे राष्ट्रीय प्रवक्ते नीरज डोनेरिया म्हणाले.
ते आज बेळगाव शहरामध्ये बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. सरकारने देशातील मंदिरे धर्मदायी विभागातून मुक्त करावीत. मंदिरांच्या मार्फत मंदिराचे जीर्णोद्धार, मंदिर विकास, गोशाळा बांधणे, गरिबांना मदत करणे, उपचार, महिला विद्यालये निर्माण आणि मुलींच्या लग्नासाठी मदत होऊ शकते. बजरंग दलाने या संदर्भात आधीच विनंती केली आहे. ते म्हणाले की, हिंदू समाजाचा विकास मंदिरांद्वारे होऊ शकतो.
देशातील हिंदू समाजात मुलांची घटती संख्या ही चिंतेची बाब आहे. हिंदूंची संख्या वाढवण्यासाठी आपण पावले उचलली पाहिजेत. प्रत्येक कुटुंबात तीन मुलांना जन्म देऊन हिंदू समाजाची लोकसंख्या वाढवणे आवश्यक आहे. त्यांनी सांगितले की, बजरंग दल या संदर्भात देशव्यापी मोहीम राबवेल.
यावेळी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments