![]() |
येळ्ळूर : सौ.राजकुंवर पावले यांचा सत्कार करताना विलास बेडरे, समवेत सतीश देसुरकर, प्रा. सी एम गोरल, रमेश धामणेकर, यल्लुप्पा पाटील,डॉ. तानाजी पावले, बी. एन. मजुकर, बळीराम देसुरकर, परशराम बिजगरकर आदी |
येळ्ळूर, ता. १८ : येळ्ळूर ग्रामपंचायतीच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्या व भाजपच्या सक्रिय कार्यकर्त्या सौ. राजकुंवर तानाजी पावले यांची बेळगाव दक्षिण भाजपा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल, येळळूर गावामधील विविध संघटनांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रस्ताविकामध्ये प्रा. सी. एम गोरल यांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाची माहिती दिली.
त्यानंतर नेताजी युवा संघटना, येळळूर ग्रामीण मराठी साहित्य संघ, सिद्धेश्वर युवक मंडळ, मरगाई युवक मंडळ या संघटनांच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. येळळूर ग्रामपंचायत सदस्य विलास बेडरे यांनी त्यांचा सत्कार केला. सत्कार ला उत्तर देताना राजकुंवर पावले म्हणाल्या, गावच्या विकासा बरोबरच, दक्षिण भागाच्या विकासासाठी कार्यरत राहून, महिला व नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य देणार आहे. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी ग्रामपंचायत सदस्य विलास बेडरे, राजू डोन्यान्नावर, माजी ग्रामपंचायत सदस्य सतीश देसुरकर, रमेश धामणेकर, यल्लुप्पा पाटील, बळीराम देसुरकर, परशराम बिजगरकर, बी. एन. मजुकर, प्रा. सी एम गोरल, डॉ. तानाजी पावले, सुभाष मजुकर, सौ. राणी देसुरकर प्रकाश डोन्यान्नावर आदी यावेळी उपस्थित होते. शेवटी बळीराम देसुरकर यांनी आभार मानले.
0 Comments