बेळगाव : चलवेनहट्टी (ता. बेळगाव) येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही महाशिवरात्रीचे आयोजन केले आहे. बुधवार दिनांक २६ रोजी मंदिरात पहाटे पुजा होईल. तसेच रात्री संगीत भजनाचा कार्यक्रम होणार आहे. शिवरात्री उत्सवा निमित्त मंदिर विद्युत रोषणाईने सजविण्यात आले आहे. गुरुवार दि. २७ रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून सकाळी ८.०० वाजता महाप्रसादला सुरवात होणार आहे. तरी पंचक्रोशीतील भाविकांनी महाप्रसादचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवरात्र उत्सव मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.
0 Comments