येळ्ळूर , ता. १३ : येळ्ळूर गावांमधील नागरी समस्या सोडवण्यासाठी सतत अग्रेसर असणाऱ्या, तसेच गरीब,दिन दलितांच्या साठी तळमळीने काम करणाऱ्या, येळळूर ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्या व येळ्ळूर विभाग भाजपाच्या सक्रिय कार्यकर्त्या सौ राजकुंवर तानाजी पावले यांची बेळगाव दक्षिण भाजपा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सदर निवड पक्षातील वरिष्ठ, कोर कमिटी सदस्य, बेळगाव जिल्हा महानगर अध्यक्षा गीता सुतार, राज्य उपाध्यक्ष व बेळगाव उत्तरचे माजी आमदार अनिल बेनके व बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या सूचनेवरून भाजपा कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये ही निवड करण्यात आली.
सौ राजकुंवर पावले या २००८ सालापासून भाजपच्या सक्रिय कार्यकर्त्या आहेत. येळ्ळूर परिसरात तसेच दक्षिण मतदार संघात भाजप पक्ष वाढीसाठी त्यांनी पुरेपूर कार्य केले आहे. गेल्या वीस वर्षापासून येळळूर ग्रामपंचायतीच्या त्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्या आहेत. मराठी भाषा आणि संस्कृती जपण्यासाठी त्या सातत्याने कार्यरत असतात. त्या उच्च विद्याविभूषित आहेत. पक्षावर निष्ठा ठेवून त्या सतत कार्य करीत असतात. भाजपाच्या त्या निष्ठावंत कार्यकर्त्या आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन पक्षाने त्यांना बेळगाव दक्षिण विभाग भाजपाचे अध्यक्षपद बहाल केले आहे. याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
0 Comments