रायबाग / वार्ताहर 

रायबाग तालुक्याच्या भेंडवड गावातील एका शेतकऱ्याच्या मक्याच्या शेतीला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले.    

भेंडवड गावातील आण्णाप्पा कदम नावाच्या शेतकऱ्याच्या पाच ट्रॉली  मक्याला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. घटनेची माहिती मिळताच रायबाग अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आग विझवली व पुढील अनर्थ टळला. या घटनेत सदर शेतकऱ्याचे अंदाजे १.२० रू. चे नुकसान झाल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे. येत्या उन्हाळी हंगामात अती तापमान आणि वीज खंडित होणार असल्याने शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, अशी माहिती सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी आर. एन. गमनगट्टी यांनी दिली आहे.