बेळगाव : वडगाव येथील सरकारी मराठी मुलांची शाळा क्रमांक ३१ चे माजी विद्यार्थी आणि बिल्डर श्री अनंतराव नारायण पाटील यांनी शाळेसाठी बांधलेल्या नूतन सभागृहाचे उद्घाटन शनिवार दि. १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता संपन्न होत आहे.

सौ. रोहिणी अनंतराव पाटील यांच्या हस्ते होणाऱ्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सार्वजनिक वाचनालय, बेळगावचे अध्यक्ष अनंत चांगाप्पा लाड हे राहणार असून पाहुणे म्हणून शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष आनंद भोसले, नगरसेवक मंगेश पवार, वडगाव क्लस्टरचे संपन्नमुल व्यक्ती इमाम सनदी आणि शिक्षण प्रेमी यल्लाप्पा नागोजीचे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.