खानापूर / प्रतिनिधी 

खानापूर तालुक्यातील नंदगडच्या श्री महालक्ष्मीदेवी यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे.  

बेळगाव जिल्ह्याच्या खानापूर तालुक्यातील नंदगड या ऐतिहासिक क्रांतीवीर संगोळ्ळी रायण्णा यांची समाधी असेलेला गावामध्ये सुमारे २४ वर्षांनंतर, ग्रामदेवता श्री लक्ष्मी देवीचा यात्रा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. आज ब्राह्मी मुहूर्तावर देवीचा विवाह सोहळा पार पडला. "श्री लक्ष्मी माता की जय" या घोषणेसह भाविकांनी नंदगडमधील श्री लक्ष्मी देवीच्या यात्रा महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. आज पासून रविवार पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.