बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव जिल्ह्यातील विविध पोलीस स्थानकांमध्ये सिव्हिल हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेल्या १४ जणांना सहाय्यक उपनिरीक्षकपदी बढती देण्याचा आदेश राज्य सरकारने जारी केला आहे.

यामध्ये के.बी. कांबळे, एस.व्ही. होलेगार, बी.एस. पुजारी, एन.आय. केंपशिवन्नावर, जी. सी. अलादकट्टी, बी.पी. पॅरगोन्नमवर, ए.बी. चांदुरी, आय. जी. वाळकी, पी. एन.वाळकी , एल. एन. कुंभार, एम. संबळद, ए.के. बडागी, एस.डी. बागोजी आणि व्ही. एन. हेब्बाळ यांना एएसआय पदावर बढती देऊन विविध स्थानकांवर नियुक्त करण्यात आले आहे, जे यापूर्वीच विविध स्थानकांमध्ये सीएचसी म्हणून कार्यरत होते.

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.भीमाशंकर गुळेद यांनी मंगळवारी पदोन्नती झालेल्या सर्व अधिकाऱ्यांना आदेशाची प्रत देऊन त्यांचे अभिनंदन केले.