बेळगाव : बाग परिवाराचा फेब्रुवारी महिन्यातील कार्यक्रम शनिवार दि 8 रोजी किर्लोस्कर रोडवर येथील जत्ती मठामध्ये मोठ्या आनंदाने व उत्साहात पार पडला.
जवळजवळ वीस कवींनी आपल्या कविता बहारदारपणे सादर केल्या. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. सुरूवातीस अक्षता येळ्ळूरकरने केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा हे भक्ती गीत गायिले. यावेळी वेगवेगळ्या विषयावरील कवितांचे सादरीकरण केले गेले. निळूभाऊ नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. निळू भाऊ नार्वेकर यांनी (शब्द) ,ज्योतिबा नागवडेकर (मीच तुझा अपराधी), किरण पाटील (दात), डॉ संजीवनी खंडागळे (आई), स्मिता किल्लेकर (कधी तू), सुवर्णा पाटील (तांडव मेघराजाचे), शितल पाटील (वाट) , प्रतिभा सडेकर (नका समजू लहान), स्मिता पाटील (तुला अनुभवताना), अक्षता येळ्ळूरकर (आश्रमातील बाप) ,शुभदा खानोलकर (मालवणी माणसा तुका सलाम), स्नेहल बर्डे (तू देशील साथ मला) अपर्णा पाटील (दारू) ,गुरुनाथ किरमिटे (विरोधाभास) ,चंद्रशेखर गायकवाड (जर कविता नसती), अस्मिता आळतेकर (बिचारा नारळ), प्रा. मनीषा नाडगौडा (हळदी कुंकू), रोशनी हुंद्रे (उलघडलेली घडी), अशोक सुतार (कविता पण), अशा आशय घन कविता कार्यक्रमात सादर झाल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्मिता पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षता येळ्ळूरकर यांनी केले. शेवटी प्रा. शुभदा प्रभू खानोलकरांनी मालवणी भाषेत आभार मानून कार्यक्रमाची सांगता सुंदर रित्या केली. एकंदरीत बाग परिवाराचा काव्यवाचनाचा हा कार्यक्रम बहारदार झाला.
0 Comments