बेळगाव / प्रतिनिधी 

ग्राहकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करण्यासाठी कर्नाटक राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे कायमस्वरूपी फिरते न्यायालय बेळगाव येथे सुरू करण्यात आले असून, ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या जिल्हा प्रतिनिधी व सदस्यांचा कर्नाटक दलित संघर्ष समितीच्यावतीने सत्कार करण्यात आला.

कर्नाटक राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या कायमस्वरूपी फिरत्या न्यायालयाचे बेळगाव जिल्ह्यात ग्राहकांच्या तक्रारींचे त्वरीत निवारण करण्यासाठी उद्घाटन करण्यात आले आहे. ज्यामध्ये रविशंकर प्रतिनिधी आणि सुनीता बागेवाडी आणि मल्लिकार्जुन कामतगी सदस्य आहेत. यांचा कर्नाटक दलित संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष सिद्धाप्पा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली सत्कार करण्यात आला.

यावेळी वकील चन्नाप्पा बागेवाडी, भाऊ गडकरी, जानबा कांबळे, महांतेश तलवार, तुकाराम कांबळे, संतोष तलवार आदी उपस्थित होते.