बेळगाव : उत्तर कर्नाटकात प्रथमच (42.195) किलोमीटर अंतराच्या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत विविध राज्यातील चार हजाराहून अधिक धावपटू भाग घेणार आहेत. अशी माहिती रोटरी क्लब ऑफ वेनूग्रामचे अध्यक्ष विनयकुमार बाळीकाई यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
यावेळी पुढे बोलताना बाळीकाई म्हणाले,उत्तर कर्नाटकात प्रथमच 42.195 किलोमीटरची पूर्ण मॅरेथॉन स्पर्धा संपन्न होत आहे.या स्पर्धेअंतर्गत (21.0975) किलोमीटर अंतराची हाफ मॅरेथॉन स्पर्धा तर 10, 5 आणि 3 किलोमीटर अंतराची फनरन आणि वॉक या पाच प्रकारच्या श्रेणीत स्पर्धा संपन्न होणार आहेत. 16 फेब्रुवारी रोजी सकाळी पाच वाजल्यापासून सीपीएड मैदानावर स्पर्धेला प्रारंभ होईल आणि संपूर्ण कॅन्टोन्मेंट परिसरात स्पर्धा होऊन या स्पर्धेची सांगता पुन्हा सीपीएड मैदानावरच होणार आहे. या स्पर्धेतील पुरुष आणि महिला अशा विविध वयोगटातील विजेत्यांना आकर्षक व रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर सर्व श्रेणीतील सर्व नोंदणीकृत धावपटूंना आकर्षक पदके, शर्यतीनंतर चहा फराळ, टी-शर्ट, हायड्रेशन सपोर्ट आणि शर्यती दरम्यान वैद्यकीय मदत याव्यतिरिक्त ई - टायमिंग प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे.
रन इंडियाच्या डब्ल्यू डब्ल्यू रन इंडिया डॉट इन या वेबसाईटवर या शर्यतीसाठी नोंदणी सुरू झाली आहे. नोंदणी करण्याची अंतिम तारीख 12 फेब्रुवारी पर्यंत आहे. अधिक तपशिलांसाठी धावपटूंनी आयोजकांशी मोबाईल क्रमांक 8283875150 अथवा 9844480030000संपर्क साधावा आणि स्पर्धेच्या www रोटरी बीएचएम डॉट इन या वेबसाईटवर देखील संपर्क साधावा असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना स्पर्धेचे तांत्रिक सल्लागार जगदीश शिंदे म्हणाले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गो ग्रीन या थीमवर जनजागृती आणि बेळगाव मधील नागरिकांमध्ये आरोग्य आणि फिटनेस ला प्रोत्साहन देण्यासाठी सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत बेळगावच्या नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा. या स्पर्धेत मुंबई, पुणे, बेंगलोर, हुबळी, धारवाड यांसह इतर शहर आणि राज्यातील धावपटू मोठ्या संख्येने भाग घेणार आहेत असेही स्पष्ट केले.
यावेळी गो ग्रीन थीम असलेल्या कार्यक्रमाच्या टी-शर्टचे अनावरण ॲथलेटिक आयर मॅन डॉक्टर सतीश चौलीगर, आयर्न वुमन डॉक्टर मयुरा शिवलकर,आयर्न मॅन संतोष शानबाग,आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू तनिष्का कालभैरव, अपूर्व खानोलकर,डॉक्टर संजीव गुडगनट्टी, डॉ. नेत्रा सुतार,अमन नदाफ, सृष्टी पाटील, विजयकुमार हिरेमठ, राजू नायक व सुषमा भट यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धा चेअरमन कपिल कालभैरव, मल्लिकार्जुन मुरगुडे,मार्गदर्शक उमेश रामगुरवाडी, महेश अनगोळकर रोटेरियन सोमनाथ कुडचीकर यावेळी उपस्थित होते.
0 Comments