• दहा लाख रुपयांचा माल मुद्देमाल जप्त
  • एपीएमसी पोलिसांची कारवाई 

बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव येथील बेळगाव एपीएमसी पोलिसांनी स्टेअरव्हील चोरट्याला अटक केली असून त्याच्या ताब्यातून १० लाख रुपयांच्या वस्तू जप्त करण्यात यश मिळवले आहे. दुसऱ्या आरोपीला पकडण्यासाठी जाळे पसरविण्यात आले आहे.

बेळगावचे पोलिस आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक पोलिस आयुक्त, मार्केट उपविभाग, बेळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि

बेळगावच्या एपीएमसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक यूएस अवटी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बेळगावातील नेहरू नगर येथील सुतारिया ऑटोमोबाईल परिसरात पार्क केलेल्या महिंद्रा बुलेरो पिकअप वाहनांना बसवलेल्या स्टेअरव्हील चोरणारा सय्यदहसेन सय्यदनुर याला शिवमोगा येथे अटक केली आहे. सुमारे ६०,००० रुपये किमतीचे ५ स्टेअरव्हील आणि सुमारे ९,५०,००० रुपये किमतीचे टाटा इंट्रा - ३० गोल्ड वाहन जप्त केले आहे, एकूण १०,१०,००० रुपये किमतीचे जप्त केला असून तपास सुरु आहे. शिवमोग्गा येथील रहिवासी असलेल्या फरार आरोपी सोनू सय्यद समीउल्लाहला शोधण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे.

या प्रकरणात, एपीएमसी पोलिस स्टेशनचे पीएसआय, एस.आर. मुत्तत्ती, बी. के. मीठगार, एएसआय, डी.सी. सागर, बसवराज नरगुंद, खादरसभा खानम्मावर, नागप्पा, बीरगोंडा, गोविंदप्पा

पूजार आणि पोलिस तांत्रिक विभागाचे कर्मचारी रमेश अक्की, महादेव खाशी यांनी केलेल्या प्रशंसनीय कार्याबद्दल पोलिस आयुक्त आणि उपायुक्तांनी त्यांचे कौतुक केले आहे.