बेळगाव : भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते व बोकनूर गावचे सुपुत्र श्री. गुणवंत सुतार यांची नुकतीच बेळगाव जिल्हा दूरसंचार निगम मंडळाच्या सल्लागार समितीवर नेमणूक झाली आहे.
बेळगाव ग्रामीण भाजपचे माजी मंडळ अध्यक्ष श्री. धनंजय जाधव यांच्या विनंतीने राज्यसभा सदस्य श्री. इराण्णा कडाडी यांच्या शिफारशी नुसार केंद्रीय दूरसंचार निगम मंडळ संचालक श्री. उर्मेशी सागवन यांच्या आदेशानुसार ही नेमणूक झाली आहे.
यामुळे बेळगाव तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तसेच समाजाच्या विविध स्तरातील मान्यवरांकडून श्री. गुणवंत सुतार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
रविवार (दि. ९) फेब्रुवारी रोजी गुणवंत सुतार यांनी बेळगाव ग्रामीण भाजपचे माजी मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली व धन्यवाद दिले. यावेळी धनंजय जाधव यांनी गुणवंत सुतार यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी श्री. अनिल पाटील, शहाजी जाधव व इतर भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments