बेळगाव : दरवर्षीप्रमाणे या वर्षीही मैत्रेयी कलामंच मंडळाचा छोटेखानी हळदीकुंकू कार्यक्रम जत्तीमठ किर्लोस्कर रोड येथे पार पडला. नेहमीप्रमाणे सामाजिक दृष्टीकोनातून सामान्य महिलांसोबत हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.आजूबाजूच्या भाजी विक्रेत्या महिलांना बोलावून त्यांना हळदीकुंकू, तिळगुळ,व भेटवस्तू वाण म्हणून देण्यात आले.
मैत्रेयी कलामंच मंडळ आपले वर्षभरातील विविध उपक्रम अनाथाश्रम, वृध्दाश्रम,सामान्य कष्टकरी महिला, अशा गरजू लोकांसोबत राबवते हे या मंडळाचे वैशिष्ट्य आहे.जेणेकरून समाजातील गरजू, कष्टकरी महिलांना सुद्धा या निमित्ताने अशा सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होण्याचा आनंद मिळावा व त्या आपल्या समुहाशी जोडल्या जाव्यात हा एकच उद्देश मैत्रेयी कलामंचचा नेहमी असतो. अशा विविध प्रकारच्या अनोख्या उपक्रमांद्वारे मैत्रेयी कलामंच मंडळ असंख्य सामान्य कष्टकरी महिलांशी व गरजू लोकांशी आपुलकीने जोडले गेले आहे.यावेळी मैत्रेयी कलामंचच्या सदस्या सौ. अस्मिता आळतेकर, सौ. स्मिता किल्लेकर, प्रा. मनिषा नाडगौडा, सौ. रोशनी हुंद्रे व सौ. अक्षता यळ्ळूरकर उपस्थित होत्या.
0 Comments