बेळगाव : येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचालित शिवराज हायस्कूल बेनकनहळ्ळी येथे हायस्कूलचा माजी विद्यार्थी चित्रपट निर्माते कु. निलेश परशराम पाटील यांचा युवा पिढीला जागृत करणारा लवेरिया या मराठी चित्रपटाचा उद्घाटन कार्यक्रम हायस्कूलच्या सभागृहात उत्साहात संपन्न झाला. 

उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री. पी. आर. पाटील हे होते. कार्यक्रमाची सुरुवात मुलींच्या स्वागत गीताने झाली. प्रास्ताविक इंग्रजी विषयाच्या शिक्षिका एल. पी. झंगरूचे यांनी केले. यानंतर चित्रपट निर्माता हायस्कूलचा माजी विद्यार्थी श्री. निलेश पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.  यानंतर मुख्याध्यापक श्री. पी. आर. पाटील, श्री. एस. टी. तारीहाळकर, श्री. जी. आय. गुंजटकर, श्री. पी. के. झांजरी व इतर शिक्षक यांच्याहस्ते स्क्रीनवरील फीत कापून उद्घाटन करण्यात आले. यानंतर कु.निलेश पाटील यांनी चित्रपटाची थोडक्यात माहिती देऊन चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी आलेले अनुभव सांगितले. श्री. पी. आर. पाटील यांच्या अध्यक्षीय भाषणानंतर प्रोजेक्टरद्वारे चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. हायस्कूल मधील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षक वर्गाने चित्रपट पाहिला या कार्यक्रमाची सूत्रसंचालन श्री. पी. के. झाजरी यांनी तर आभार प्रदर्शन श्री. एस. टी. तारीहाळकर यांनी केले.