- महाराष्ट्र आणि कर्नाटकात सुरू असलेल्या परिस्थितीबाबत चर्चा करण्याची मागणी
दिल्ली : देशाच्या राजधानीत सुरू असलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला बेळगाव सीमा भागातील मराठी भाषिक मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित राहिले आहेत. सीमा प्रश्नाच्या लढ्यात अग्रेसर असलेल्या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आणि कार्यकर्तेही दिल्लीत आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने आज सकाळी खासदार सुप्रियाताई सुळे यांची भेट घेऊन संसदेत सीमाप्रश्नी आवाज उठवा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन सध्या महाराष्ट्र आणि कर्नाटकात सुरू असलेल्या परिस्थितीबाबत चर्चा करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली.
दरम्यान सर्वोच्च न्यायालयात सीमाप्रश्नाची बाजू मांडणारे महाराष्ट्राचे वकील शिवाजी जाधव यांचीही भेट शिष्टमंडळाने घेतली आणि लवकरात लवकर दावा पटलावर घेण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली.
यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकिकरण समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे, माजी नगरसेवक नेताजी जाधव, खानापूर तालुका समिती अध्यक्ष गोपाळ देसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी, गोपाळ पाटील, पांडुरंग सावंत, बाबू कोले. सुनील आनंदाचे, उमेश पाटील, सुहास हुद्दार, मारुती मरगाणाचे, राजाराम देसाई, भीमसेन करंबळकर, रवळू वड्डेबैलकर यांसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments