विजयपूर / दीपक शिंत्रे
मिळालेल्या माहितीच्या आधारे विजयपूर जिल्ह्याच्या तिकोटा तालुक्यातील यत्नाळ गावाच्या रि.स.नं: ११४/३ येथील ०१ एकर ३७ गुंटे जमिनीत गांजाचे पिकाचे उत्पादन करणाऱ्या मल्लू गोविंद कर्वे (वय ६० वर्षे, स.यत्नाळ ता. तिकोटा जि: विजयपूर) आणि मणिगेनी गोविंद कर्वे (वय ६३ वर्षे,स.यत्नाळ ता.तिकोटा जि. विजयपूर) यांच्या विरुद्ध कारवाई करुन अटक केली आहे.
त्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी आपल्या जमिनीत गहू आणि मका पिकांमध्ये अवैधरित्या गांजा पिकवला होता आणि त्यांच्या विरोधात कारवाई करून अंदाजे ७९,८०,०००/- रुपये किमतीचा एकूण २२८ किलो ताज्या गांजा झाडांची जप्त करण्यात आले आहेत.
याबाबत सीईएन पोलिस स्थानकात गुन्हा नोंदवून आरोपींना अटक करून मान्य न्यायालयात हजर करण्यात आले. जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांचा मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त पोलिस आयुक्त शंकर मारिहाळ, रामनगौडा हट्टी, सुनिल कांबळे पोलिस निरीक्षक रमेश अवजी व इतर पोलीस कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते.
0 Comments