पिरनवाडी येथील नवीन ग्रामपंचायत जनता प्लॉट येथे येत्या रविवार दि. ९ फेब्रुवारी २०२५ रोजी कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे. सदर कुस्ती मैदान यशस्वी करण्याच्या दृष्टीने आयोजकांकडून तयारी करण्यात येत आहे. सदर कुस्ती मैदानात कर्नाटक व महाराष्ट्रातील मातब्बर पैलवान हजेरी लावणार आहेत. कुस्ती मैदानासाठी आखाडा निर्मितीचे काम हाती घेण्यात आले असून कुस्ती आश्रयदाते सतीश पाटील यांच्यासह कुस्ती मैदानाच्या आयोजक समितीचे अध्यक्ष रवी मुचंडीकर, उपाध्यक्ष मुन्ना नबीवाले, शिवसेना तालुका प्रमुख सचिन गोरले, नारायण मुचंडीकर, गणेश आपटेकर, मल्लाप्पा उचगावकर, सुभाष देसाई सुदिन नेसरकर आदींनी आज मंगळवारी सकाळी आखाड्याच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. तसेच प्रेक्षक गॅलरी वगैरेंची माहिती घेऊन आवश्यक सूचना केल्या.
0 Comments