बेळगाव : येळ्ळूर (ता.बेळगाव) विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नूतन कार्यकारणीच्या पुनर्रचनेसंदर्भात येत्या गुरुवार दि. 7 फेब्रुवारी 2025 रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले आले असून समिती निष्ठांनी या बैठकीला हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्या गेल्या सोमवारी 3 फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत मागील बैठकीचा आढावा घेताना 2018-19 मध्ये तयार झालेल्या येळ्ळूर विभाग म. ए समिती कार्यकारणीचा 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे ती बरखास्त करावी आणि नूतन कार्यकारणी निवडावी दृष्टीने चर्चा करण्यात आली, असा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शांताराम कुगजी यांच्या अध्यक्षतेखाली आज मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये पूर्वीची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्याचा ठराव या एकमताने संमत करण्यात आला. तसेच नूतन कार्यकारणी निवडण्यासंदर्भात येत्या गुरुवारी 7 फेब्रुवारी रोजी बैठक घेऊन निर्णय घेण्याचे ठरले. आजच्या बैठकीस माजी ता. पं. सदस्य रावजी पाटील, ग्रा. पं. उपाध्यक्ष प्रमोद पाटील, माजी ग्रा. पं. अध्यक्ष सतीश पाटील, विलास घाडी, वाय. सी. इंगळे, परशराम घाडी, ग्रा. पं. सदस्य, सदस्या, माजी ग्रा. पं. सदस्य, जेष्ठ नेते व समितिनिष्ठ असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. तरी येळ्ळूर गावातील ज्येष्ठ व युवा समितिनिष्ठ नेते कार्यकर्ते, तसेच आजी - माजी लोकप्रतिनिधींनी येत्या गुरुवारच्या बैठकीस उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.