- १४ रोजी मुख्य दिवस : विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
दड्डी / वार्ताहर
कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा व कोकण भागातील जनतेचे आराध्य दैवत श्री भावेश्वरी देवी मोहनगा येथील यात्रेला १३ फेब्रुवारीपासून प्रारंभ होणार आहे. ही यात्रा १३, १४ व १५ रोजी साजरी होणार आहे. १४ रोजी यात्रेचा मुख्य दिवस असून भाविकांनी आयोजित कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे. १३ रोजी सायंकाळी सहा वाजता शस्त्र इंगळ्यांचा कार्यक्रम, १४ रोजी यात्रेचा मुख्य दिवस असल्याने देवीला दंडवत व महानैवेद्य कार्यक्रम, १५ रोजी पालखी मिरवणूक काढल्यानंतर यात्रेची सांगता होणार आहे.
मंदिर आवारात दुकाने थाटण्यासाठी जागेचा कर सलामवाडी ग्रामपंचायतीकडे भरावा लागणार आहे. दरवर्षीप्रमाणे परिवहन महामंडळाच्या वतीने बेळगाव परिवहन महामंडळ महाराष्ट्रातील गडहिंग्लज आगारातून भाविकांसाठी विशेष बसची सोय करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीच्यावतीने पिण्याच्या पाण्याची सोय, वैद्यकीय सेवा सुरळीत करण्यात येणार आहे. यात्रा काळात कोणतीही कमतरता बसल्यास त्या समस्या सोडवल्या जातील. ग्रामपंचायत पावती काढल्याशिवाय कोणतेही दुकान लावण्यास परवानगी दिली जाणार नाही. पावती घेतल्याशिवाय बकरी विक्रीला परवानगी नाही, असे ग्रामपंचायतीच्या वतीने कळविण्यात आले आहे.
0 Comments