बेळगाव / प्रतिनिधी
येळ्ळूर येथील 'महाराष्ट्र राज्य येळ्ळूर' नामफलका संदर्भातील एका खटल्यात आज मंगळवारी बेळगाव द्वितीय जेएमएफसी न्यायालयासमोर २६ आरोपींचे जबाब नोंदवून घेण्यात आले.
काही वर्षांपूर्वी येळ्ळूर येथील 'महाराष्ट्र राज्य येळ्ळूर' हा फलक उखडवण्यात आल्यानंतर दंगल झाली होती. त्यावेळी पोलिसांनी अनेकांवर गुन्हे नोंदवून खटले दाखल केले होते. या खटल्यांपैकी १६६/१५ क्रमांकाच्या खटल्यातील आरोपींचे आज मंगळवारी बेळगाव द्वितीय जेएमएफसी न्यायालयासमोर आरोपींचे जबाब नोंदवून घेण्यात आले. या खटल्यातील आरोपींमध्ये नामदेव विठ्ठल कदम, नागराज दौलत कुगजी, हनुमंत लुमाना कुगजी, राजू ज्योतिबा नायकोजी, आनंद यल्लाप्पा मुचंडी, मारुती महादेव अष्टेकर, जयसिंग यल्लाप्पा अष्टेकर, दीपक बाबुराव खादरवाडकर, पवन गजानन पोटे, उत्तम तुकाराम धामणेकर, जयवंत गंगाराम टक्केकर, सुनील गुरुराज मुतगेकर, सदानंद यल्लाप्पा पोटे, प्रशांत शंकर टक्केकर, परशुराम यल्लाप्पा धामणेकर, राजू विठ्ठल मासेकर, पुंडलिक विष्णू जाधव, परशुराम गणपती जाधव, बाळू शंकर धामणेकर, रजत परशुराम संभाजीचे, कपिल मल्लाप्पा भोई, बसवराज शिवाप्पा कलमठ, विकास विलास नंदी, परशुराम यल्लाप्पा नंदी, विलास मोनाप्पा नंदी व अतुल नारायण मुचंडी अशा एकूण ३० आरोपींचा समावेश आहे .
सदर आरोपींपैकी मनोहर यल्लाप्पा मजूकर याचे निधन झाले आहे, तर सुधीर परशुराम धामणेकर, हनुमंत फकीरा धामणकर व सुरज यल्लाप्पा घाडी हे तिघेजण वारंवार गैरहजर राहत असल्यामुळे त्यांना वगळण्यात आले आहे. खटल्याची पुढील तारीख १५ जानेवारी २०२५ ही देण्यात आली आहे. आरोपींच्यावतीने ॲड. शामसुंदर एन. पत्तार, ॲड. हेमराज एस. बेंचन्नावर आणि ॲड. श्याम पाटील हे काम पाहत आहेत.
0 Comments