बेळगाव / प्रतिनिधी
बांगलादेशमध्ये इस्कॉन मधील श्री चिन्मय कृष्णदास प्रभू स्वामीजींना अटक करून मंदिरांचा विध्वंस, महिलांवरील अत्याचार, हिंदूंना अमानुष मारहाण सुरू आहे.
याचा जाहीर निषेध करण्यासाठी उद्या बुधवार दि. ८ जानेवारी रोजी सकाळी ९.४५ वा. नागरिक हितरक्षणा समिती व इस्कॉन मंदिर बेळगाव यांच्यावतीने भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे. धर्मवीर संभाजी महाराज चौकापासून मोर्चाला सुरुवात होणार असून किर्लोस्कर रोड, रामदेव गल्ली, खडे बाजार, शनिवार खुट, काकतीवेस रोड मार्गे चन्नम्मा सर्कल येथे मोर्चाची सांगता होणार आहे. त्यानंतर भव्य मानवी साखळी करण्यात येणार आहे. तरी सर्व हिंदू बांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
0 Comments