- विजयपूरच्या "त्या" चार मुलांना बापानेच फेकले कालव्यात
विजयपूर / वार्ताहर
कौटुंबिक वादातून एका आईने आपल्या चार मुलांसह कालव्यात उडी आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणाला मोठे वळण मिळाले आहे. विजयपूर जिल्ह्यातील निडगुंदी तालुक्यातील बेनाळजवळील अलमट्टी येथे एका आईने आपल्या मुलांसह डाव्या कालव्यात उडी घेऊन घेतली जलसमाधी" या शीर्षकाखाली विविध माध्यमांतून प्रसारित झालेल्या या बातमीने संपूर्ण कर्नाटकात खळबळ उडाली होती. मात्र, आता या प्रकरणाला मोठे वळण मिळाले आहे. भाग्यश्रीवर सध्या विजयपूर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत तिने सत्य उघड केले.
महिलेने दिलेली अधिक माहिती अशी की, पतीने जवळपास रु. 30 लाखांचे कर्ज घेतले होते ते फेडण्यासाठी त्याची धडपड सुरू होती, म्हणून त्यांनी वडिलांकडे मालमत्ता मागितली. त्यांनी दिली नाही. मालमत्ता न दिल्याने तो नाराज झाला आणि त्याने मुलांसह आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. मालमत्ता दिली असती तर जमीन विकून कर्ज फेडण्याचा निर्णय घेतला असता. या पार्श्वभूमीवर पतीने मुलांसह आत्महत्या करण्यासाठी विषाची बाटली आणली होती. चार मुलांसह सर्वजण घराबाहेर पडले. पतीने आधी मुलांना विष पाजले. त्यानंतर त्याने महिलेसह चारही मुलांना कालव्यात फेकून दिले आणि तेथून निघून गेला. यातून वाचलेल्या भाग्यश्रीने नातेवाईकांना कॉल करून सविस्तर माहिती सांगितली. कोल्हार तालुक्यातील तेलगी गावातील 5 वर्षांची तनु लिंगराज भजंत्री, 3 वर्षांची रक्षा लिंगराज भजंत्री, 13 महिन्यांची हसन लिंगराज भजंत्री आणि हुसेन लिंगराज भजंत्री अशी मृत मुलांची नावे आहेत. स्थानिकांनी वाचवलेल्या महिलेला जिल्हा रुग्णालयात दाखल केले आणि आता ती बरी झाली आहे.
0 Comments