बेळगाव / प्रतिनिधी 

ज्येष्ठ नेते काॅम्रेड कृष्णा मेणसे यांचे दि. १३ जानेवारी रोजी निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गुरुवार दि. १६ जानेवारी रोजी सायंकाळी साडेचार वाजता सर्वपक्षीय शीकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. ओरिएंटल हायस्कूल, रेल्वे ओव्हर  ब्रिज, खानापूर रोड बेळगांव येथे ही शोकसभा होणार आहे. सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी केले आहे.