सुळगे (ये.) : नेताजी हायस्कूल सुळगे (ये.) येथील सभागृहात मोठ्या उत्साहात नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या फोटोंचे पूजन कन्नड विषयाचे शिक्षक श्री. एस. एस. केंगेरी यांनी केले. तदनंतर अनेक विद्यार्थ्यांची भाषणे झाली.
समाज विज्ञान विषयतज्ञ शिक्षक श्री. एम. पी. कंग्राळकर सर यांनी आपल्या भाषणातून नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जीवन प्रवास कथन केला. नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती अधिकृतपणे पराक्रम दिवस किंवा शौर्य दिन म्हणून ओळखला जातो.हा भारतातील एक राष्ट्रीय कार्यक्रम आहे. जो प्रख्यात भारतीय सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या वाढदिवसानिमित्त साजरा केला जातो.ते भारतीय राष्ट्रीय सेना (आझाद हिंद सेनेचे) प्रमुख होते.अशा अनमोल शब्दात आपले विचार व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाला उपस्थित शाळेचे मुख्याध्यापक श्री. टी. वाय. भोगण सर, श्री. जे. जे. पाटील सर, सौ. सुजाता वंडेकर मॅडम, श्रीमती रेखा कंग्राळकर मॅडम, सौ. एस. एन. जाधव मॅडम, श्री. एम. एस. वाडकर सर आणि श्री. एन. एस. कुकडोळकर व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती. आर. ए. कंग्राळकर मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. सुजाता वंडेकर मॅडम यांनी केले.
0 Comments