खानापूर / प्रतिनिधी
खानापूर नगरपंचायतीच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूक सोमवार दि. २७ जानेवारी रोजी होणार आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने खानापूर पट्टण पंचायतीच्या २० सदस्यांना सोमवार दि. २७ जानेवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. निवडणूक प्रक्रिया दुपारी ३ वाजता नगरपंचायत सभागृहात सुरू होईल.
अध्यक्ष व उपाध्यक्ष ही पदे दोन वर्षांसाठी सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असल्याने नगरसेवक लक्ष्मण मादार यांनी न्यायालयाकडून प्रतिबंधात्मक आदेश आणला होता. मात्र पुन्हा निवडणूक होणार आहे. खानापूर नगरपंचायतीच्या २० नगरसेवकांपैकी ९ महिला नगरसेविका आहेत. यामध्ये अध्यक्षपदासाठी तीन ते चार नगरसेवकांमध्ये स्पर्धा होत असल्याने चुरस निर्माण झाली आहे. या निवडणुकीत आमदार व विधानपरिषद सदस्यांसह २० नगरसेवकांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.
0 Comments