बेळगाव / प्रतिनिधी 

राष्ट्रीय रस्ता सुरक्षा जागरूकता महिन्याच्या पार्श्वभूमीवर बेळगावात "रस्ता सुरक्षा - जीवन संरक्षण" या संदर्भात जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली होती.

भारत सरकार आणि कर्नाटक सरकार परिवहन विभाग, बेळगाव जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग, शिक्षण विभाग, नेहरू युवा केंद्र, भारत स्काऊट अँड गाईड्स आणि फेडरेशन ऑफ मोटार वाहन प्रशिक्षण केंद्र  यांच्या संयुक्त विद्यमाने रोड "सेफ्टी - लाईफ प्रोटेक्शन" नावाने  या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केएसआरपी कमांडंट रमेश बोरगावे, भारत स्काऊट अँड गाईड्सचे जिल्हाप्रमुख गजानन मन्निकेरी, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी एम. गौतम रेड्डी, एनएसएस जेजीएनडी समन्वय अधिकारी यल्लाप्पा धबली यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून रॅलीचे उद्घाटन करण्यात आले. 

बेळगावच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे रस्ता सुरक्षा महिना राबविण्यात येत असून पदयात्रेच्या माध्यमातून रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करण्यात येत आहे. रस्त्यावरून प्रवास करताना इतरांना त्रास न देण्याचा संदेश दिला जात आहे. यामध्ये बेळगाव येथील स्काऊट अँड गाईड्सचे विद्यार्थी व मार्गदर्शक यांचा सहभाग आहे. शिक्षण, अंमलबजावणी आणि अभियांत्रिकी हे माहिती आणि ज्ञानाचे मूलभूत तीन स्तंभ आहेत. तसेच जनजागृतीसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असल्याचे प्रादेशिक परिवहन विभागाच्या सहआयुक्त एम.ओंकारेश्वरी म्हणाल्या. 

या रॅलीत बेळगावचे प्रादेशिक परिवहन अधिकारी नागेश मुंडस, डीडीपीआय लीलावती हिरेमठ, बसवराज कडली यांच्यासह  विविध शाळांमधील मुलांचा सहभाग होता.