• रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण - रोट्रॅक्ट क्लब ऑफ युवा दर्पणचा संयुक्त उपक्रम  

बेळगाव / प्रतिनिधी 

रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण आणि रोट्रॅक्ट क्लब ऑफ युवा दर्पण यांच्या संयुक्त विद्यमाने लोमॅक्स आश्रम आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काही गरजू लोकांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, या उदात्त भावनेतून समाजाची गरज ओळखून रोट्रॅक्ट क्लब ऑफ युवा दर्पणने  हा प्रमुख उपक्रम राबवला आहे.

यावेळी आरसीबी दर्पण अध्यक्षा आरटीएन. रुपाली जनाज, कार्यक्रमाच्या अध्यक्षा आरटीएन. शीला पाटील, आरटीएन.सुरेखा मुम्मीगट्टी, आरटीएन. लक्ष्मी चवली, आरटीएन. सविता वेसणे तसेच रोट्रॅक्ट क्लब युवा दर्पणचे अध्यक्ष संकल्प पाटील, आयपीपी आरटीआर अर्पिता निंगनुरे, माजी अध्यक्ष आरटीआर. प्रीती मन्निकेरी, रोट्रॅक्टर्स इव्हेंट चेअर आरटीआर संजना दोड्डमनी आदी उपस्थित होते.