बेंगळुरू : निवडणूक काळातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल चिक्कोडी उपविभागीय अधिकारी सुभाष संपगावी यांचा सर्वोत्कृष्ट निवडणूक पद्धतींचा राज्य पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. बेंगळुरू येथे शनिवारी आयोजित १५ व्या राष्ट्रीय मतदार दिन - २०२५ मध्ये राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्याहस्ते सुभाष संपगावी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
२०२४- २५ लोकसभा निवडणुकीदरम्यान रायचूर येथे सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून त्यांनी केलेल्या उत्कृष्ट सेवेबद्दल, निवडणूक आयोगाने त्यांना २०२४ -२५ च्या सर्वोत्कृष्ट निवडणूक पद्धतींचा राज्य पुरस्कार देऊन सन्मानित केले.
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी व इतर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुभाष संपगावी यांचे त्यांच्या कार्याबद्दल अभिनंदन केले.
0 Comments