बेळगाव / प्रतिनिधी 

आयपीएस डॉ. संजीव पाटील यांना त्यांच्या प्रशंसनीय कार्याबद्दल राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात आले आहे. 

डॉ. संजीव पाटील यांनी यापूर्वी बेळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून काम केलेले आहे. आयपीएस संजीव पाटील हे लोकाभिमुख पोलिस व्यवस्था आणण्यात यशस्वी झाले आहेत. एवढेच नाही तर त्यांनी एसपी असताना फोन इन कार्यक्रमाद्वारे ग्रामीण भागातील लोकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी एक नाविन्यपूर्ण कार्यक्रम यशस्वीरित्या राबविला होता.

यावेळी राज्यातील एकूण २१ पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक, दोघांना विशिष्ट सेवा पदक आणि उर्वरित अधिकाऱ्यांना राष्ट्रपती प्रशंसनीय सेवा पदक प्रदान करण्यात आले आहे.