खानापूर / प्रतिनिधी 

खानापूर तालुक्याच्या घनदाट अरण्यातील जांबोटी भागातील कणकुंबी नजीक, हुळंद - कणकुंबी रस्त्यावर एका पट्टेरी वाघाचे दर्शन झाले आहे. दुचाकीवर प्रवास करणाऱ्या काही नागरिकांनी भर दिवसा या वाघाला रस्त्यावर चालताना पाहण्याचा प्रसंग अनुभवला. 

या नागरिकांनी घाबरून न जाता आपल्या दुचाकी थांबवून वाघाचा व्हिडिओ आणि छायाचित्रे मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली आहेत.

या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, वन खात्याने त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे. स्थानिकांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

वन विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन वाघाचा ठावठिकाणा निश्चित करावा आणि स्थानिकांचे संरक्षण सुनिश्चित करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.