हुबळी / वार्ताहर 

प्लास्टिकच्या पिशवीत नवजात अर्भकाचा मृतदेह सापडल्याची धक्कादायक घटना आज मंगळवार (दि. ७) जानेवारी रोजी बेंडीगेरी पोलीस स्थानकाच्या हद्दीत पाटील गल्ली येथे उघडकीस आली.

रस्त्यावरून चालत जाणाऱ्या एका व्यक्तीला प्लास्टिकच्या पिशवीत नवजात अर्भक आढळून आल्याने त्याने बेंडीगेरी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच बेंडीगेरी  पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन नवजात बालकाचा मृतदेह किम्सच्या शवागारात पाठवला.

याप्रकरणी बेंडीगेरी स्टेशनच्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सदर अर्भकाचा मृतदेह कोणी टाकला याचा तपास सुरू आहे.