- टोळीतील एक अटकेत : तिघेजण फरार
विजयपूर / वार्ताहर
गेल्या ५ - ६ दिवसांपासून शहरातील जनतेची झोप उडवणाऱ्या दरोडेखोर टोळीवर पोलिसांनी गोळीबार केला. यावेळी त्यातील एक गोळी एका दरोडेखोरास लागली तर तिघे पळून जाण्यास यशस्वी झाले आहेत. रात्रभर दरोडेखोरावर पाळत ठेवून कारवाई करणाऱ्या पोलिसांना कारवाईत अखेर यश आले आहे. विजयपूर जिल्ह्यात गेल्या एका आठवड्यापासून दरोडेखोरांची टोळी वेगवेगळ्या भागात दरोडा टाकून सोन्याचे दागिने लुटलेल्या घटना घडलेल्या होत्या. विजयपूर पोलिसांनी आव्हान असलेल्या या टोळीतील एकास जेरबंद करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी दिली.
अधिक माहिती देताना ते पुढे म्हणाले, विजापूर शहराजवळील टोल नाक्याजवळ शुक्रवारी मध्यरात्री ३ वाजता पळून जाणाऱ्या दरोडेखोरांवर पोलिसांनी गोळ्या झाडल्या. त्यावेळी गोळी लागलेल्या दरोडेखोराला ताब्यात घेण्यात आले आहे.
शहरातील कनकदास वसाहत येथे घर पुढे जाण्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली होती. याची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी दरोडेखोरांचा पाठलाग केला. दरम्यान टोल नाक्या जवळून दरोडेखोर पळून जात असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यावेळी मूळचा मध्य प्रदेशचा रहिवासी असलेल्या महेशला गोळी लागली. तर उर्वरित तिघे फरारी झाले आहेत. त्यांच्या शोधासाठी पथके तयार करण्यात आली आहेत.
0 Comments