बेळगाव / प्रतिनिधी
प्रयागराजहून परतताना बेळगाव देशपांडे गल्ली येथील रहिवासी तथा वृत्तपत्र विक्रेते रवी जठार (वय ६१) यांचे पुणे येथे हृदयविकाराने निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे वृत्तपत्र व्यवसाय क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
प्रयागराजहून बेळगावला परतत असताना रेल्वेमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. चेंगराचेंगरीत बेळगावातील चार यात्रेकरूंचा आणि हृदयविकाराच्या झटक्याने एकाचा मृत्यू झाला. त्यामुळे महाकुंभमेळ्यात बेळगावतील पाच बळी गेल्याची चर्चा आहे.
0 Comments