बेळगाव / प्रतिनिधी
प्रयागराज कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या बेळगावच्या चारही भाविकांचे मृतदेह बेळगावला पाठविण्यात आले आहेत.
त्यापैकी शेट्टी गल्लीतील अरुण कोपर्डे (वय ६१) , छत्रपती शिवाजी नगर येथील महादेवी भावनूर (वय ४८) यांचे मृतदेह दुपारी ३.२० वाजता दिल्लीहून विमानाने बेळगाव सांबरा विमानतळाकडे रवाना झाले. तत्पूर्वी प्रयागराज येथून अरुण आणि महादेवी यांचे मृतदेह एकाच रुग्णवाहिकेतून दिल्लीला पाठवण्यात आले होते.
तर मेघा हत्तरवाट (वय २४), ज्योती हत्तरवाट (वय ४४) यांचे मृतदेह अन्य एका रुग्णवाहिकेतून नेण्यात आल्याने निर्धारित वेळेत दिल्लीला पोहोचले नाहीत. त्यामुळे या मायलेकींचे मृतदेह दिल्लीहून विमानाने संध्याकाळी ५.३० वा. गोव्यात आणले जातील आणि गोवा मार्गे रात्री ८.३० वाजता बेळगावला पोहोचतील, अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली आहे.
0 Comments