- कंत्राटदार सचिन, एसडीए रुद्रण्णावर आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी
बेळगाव / प्रतिनिधी
कंत्राटदार सचिन आत्महत्या आणि एसडीए कर्मचारी रुद्रेश यादवन्नावर यांच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआय तपासाची मागणी करत, शनिवारी बेळगावमधील भाजप कार्यकर्त्यांनी चन्नम्मा सर्कलपासून आंदोलन सुरू केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून राज्यपालांना निवेदन सादर करण्यात आले.
ठेकेदार सचिन आत्महत्या प्रकरणाच्या संदर्भात मंत्री प्रियांक खर्गे यांचा राजीनामा घेण्याची मागणी करण्यात आली. ठेकेदार सचिन यांनी आत्महत्या करण्यापूर्वी मंत्री प्रियांक खर्गे यांच्या आप्त स्वकीयांचे नाव लिहून आत्महत्या केली होती. मुख्यमंत्र्यांनी, मंत्री खर्गे यांना मंत्रिमंडळातून ताबडतोब बडतर्फ करावे अशी मागणी आंदोलकांनी केली.
तर बेळगावात एसडीए कर्मचारी रुद्रेश यादवन्नावर याने तहसीलदार कार्यालयात मंत्री हेब्बाळकर यांच्या आप्त स्वकीयांचे नाव लिहून आत्महत्या केली. या प्रकरणातील मुख्य आरोपी तहसीलदार बसवराज नागराळ हे जामीन मिळाल्याने कार्यालयात सेवा बजावण्यासाठी पुन्हा हजर झाले आहेत. त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. मंत्री प्रियांक खर्गे यांनी तात्काळ राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जावे.
सरकारमधील अधिकारी दबावाखाली काम करत आहेत. ते थांबवण्याची मागणी त्यांनी केली. माजी आमदार संजय पाटील म्हणाले, सरकार हुकूमशाही धोरण अवलंबत आहे. भ्रष्टाचार बोकाळला आहे. आंबेडकरांचा सरकारने अनेकदा अपमान केला. सरकारी दबावामुळे अनेकजण आत्महत्या करत असल्याचा आरोपकेला.
बस भाडेवाढीचा निषेध करत पुरुष प्रवाशांना गुलाबपुष्प देऊन अभिनव पद्धतीने सरकारचा निषेध केला.
या आंदोलनात भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, माजी आमदार संजय पाटील, भाजप नेते मुरुगेंद्रगौडा पाटील, सचिन कड्डी, दीपा कुडची, लीना टोपन्नावर आदी उपस्थित होते.
0 Comments