- कर्नाटक राज्य शेतकरी संघटना - हसीरू सेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
- आर्थिक गैरव्यवहारांवर कारवाईची मागणी
बेळगाव / प्रतिनिधी
गोकाक तालुक्यातील फायनान्सर्स निरक्षर महिलांची आर्थिक फसवणूक व छळ करत आहेत. तेव्हा अशा आर्थिक गैरव्यवहारांवर कारवाई करावी, या मागणीसाठी आज गोकाक तालुक्यातील निरक्षर महिलांनी कर्नाटक राज्य शेतकरी संघटना आणि हसीरू सेना यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
यावेळी कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणाले, गोकाक तालुक्यात निरक्षर लोकांना फसवून फायनान्सरकडून कर्ज मिळवून दिले. बँकवाले येऊन घर जप्त करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि अत्याचार करत आहेत. एजंटांच्या माध्यमातून बँकर्स अशा प्रकारची फसवणूक करत आहेत. त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
यावेळी अनिल शिंगे, व्ही. बी. बबरगी, अडीवेप्पा कमतगी, सन्नाप्पा सनदी, भारती पाटील आदींचा सहभाग होता.
0 Comments