चिक्कोडी / वार्ताहर 

पोटच्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या क्रूर पतीची पत्नीनेच निर्घृण हत्या करून शरीराचे तुकडे केल्याची घटना उमराणी (ता. चिक्कोडी जि. बेळगाव ) येथे घडली.

याबाबत प्राप्त माहिती अशी की, श्रीमंत इटनाळ नामक व्यक्ती रोज दारू पिऊन पत्नी आणि मुलीला मारहाण करत होता. रात्री दारू पिऊन पुन्हा पत्नी आणि मुलीला मारहाण केली. आणि स्वतःच्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने संतापलेल्या पत्नी सावित्री इटनाळ हिने पतीच्या डोक्यात दगड घालून ठार केले. नंतर शरीराचे दोन तुकडे करून एका लहान बॅरलमध्ये ठेवले. मृतदेह शेजारच्या शेतात नेला आणि गुन्ह्यासाठी वापरलेले साहित्य विहिरीत टाकून दिले आणि खून झालेले ठिकाण स्वच्छ करून आंघोळ करून अंगावरील कपडे जाळून टाकले आणि खुनासाठी वापरलेला दगड तिने आपल्या पतीच्या शेडमध्ये लपवून ठेवला. मोबाईल फोन आणि घरी ठेवला. पहिली मुलगी झोपेतून जागी झाल्यावर तिने तिला काहीही न सांगण्याचा इशारा केला. पण चौकशी केली असता शेतात मृतदेह आढळल्याने खुनाचा गुन्हा दाखल करून तपास करण्यात आला.

चिक्कोडी पोलिसांना तपासादरम्यान पत्नीवर संशय आल्याने त्यांच्याच भाषेत विचारपूस केली असता, पत्नी सावित्रीने रडत - रडत पतीची क्रूर कथा सांगितली.