बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव - पुणे रेल्वेसेवेत चार नवीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचा सुरू होण्याची शक्यता आहे. सदर ट्रेन सुरू झाल्यास बेळगाव ते पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मोठा मिळणार आहे.

पुणे ते बेळगाव हा खूप प्रतीक्षित मार्गांमध्ये समाविष्ट असून विकासाच्यादृष्टीने रेल्वे प्रशासनाच्या जलद, कार्यक्षम, आणि प्रवासी - मैत्रीपूर्ण प्रवासाच्या प्रयत्नांचा एक भाग आहे.

सध्या पुण्यात हुबळी, कोल्हापूर आणि मुंबई (पुणे मार्गे) या दोन वंदे भारत गाड्या चालवल्या जातात. आणखी चार गाड्या सुरू केल्याने या आणि नवीन मार्गावरील प्रवासाच्या सोयींमध्ये लक्षणीय वाढ होईल. तसेच  प्रवास अधिक सुलभ आणि आरामदायक होणार आहे. नवीन नियोजित गाड्या पुणे ते शेगाव, पुणे ते वडोदरा, पुणे ते सिकंदराबाद, पुणे ते बेळगाव मार्गांवर धावतील.  

या नवीन सेवांमुळे पुण्यातील वंदे भारत ट्रेनची संख्या सहापर्यंत पोहोचेल. हे प्रवाशांना अधिक गतीमान आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव देईल. या गाड्या सध्या सुरू असलेल्या पुणे - हुबळी वंदे भारतचे नियोजित दिवस वगळून इतर दिवशी धावतील. यामुळे बेळगावमधील प्रवाशांना पुण्याला जाण्यासाठी अधिक लवचिकता आणि प्रवासाचे पर्याय मिळतील. शिवाय या ट्रेनमुळे जलद आणि सोपा प्रवास होण्यास मदत होईल. रेल्वे प्रशासनाचा हा निर्णय पुण्याच्या वंदे भारत सेवेला एक नवी ओळख मिळवून देईल.