• लिया एस अँक्टीवा बक्षिसाच्या मानकरी

बेळगाव : पिन्स अँड लेन्सचा प्रथम वर्धापनदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. वर्धापनदिन दिनानिमित्त आयोजित बक्षिस योजनेत लिया एस अँक्टीवा, श्राव्य नायक आय फोन १६, तर श्रीनिवास जोशी या लॅपटॉप बक्षिसाच्या मानकरी ठरल्या. वर्धापनदिन सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर गोगटे समूहाचे व्यवस्थापकीय संचालक प्रभाकर आपटे, डाॅ. मनोज सुवर्ण उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन परिधी ओझा हिने केले. 

गोगटे कंपाऊंडमध्ये प्रथम वर्धापनदिन मेगा कार्निव्हलचे उद्दिष्ट सामुदायिक संबंध मजबूत करणे आणि सर्वांचे आभार  मानणे हे होते. वर्धापनदिनानिमित्त गोगटे कंपाऊंड काकती येथे मेगा कार्निव्हल संपूर्ण दिवस आयोजित करण्यात आला होता. मुलांसाठी व मोठ्यांपर्यंत सर्वाना मजेदार खेळ ठेवण्यात आले होते. तसेच स्वादिष्ट कॉम्बो ऑफर्स व  विविध स्वादिष्ट खाद्य पदार्थाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य प्रवेशासह आयोजित करण्यात आला होता. यावेळी मनोरंजन, बक्षिसे आणि आनंदाने भरलेला एक दिवस सुमारे १५०० कुटुंबातील सदस्यांनी सहभाग घेऊन आनंद घेतला.