- जुन्या प्रियकराचे कृत्य ; गोकाक येथील घटना
गोकाक / वार्ताहर
बेंगळुरू येथील प्रियकर आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी गेला असता तिच्या आधीच्या प्रियकराने सदर युवकावर चाकू हल्ला केल्याची घटना गोकाक मध्ये घडली आहे.
गोकाक तालुक्यातील संगम नगरी येथील शोभा नामक युवतीचे बेंगळुरू येथील युवकासोबत प्रेमसंबंध होते. बेंगळुरू हुन आलेल्या प्रियकराने शोभाची भेट घेण्यासाठी घर गाठले असता तिच्या आधीच्या प्रियकराने बंगळुरूच्या युवकावर हल्ला केला. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर शोभाचे दोनवेळा लग्न झाल्याचे उघड झाले आहे. आनंद अचानक तिच्या घरी आला आणि शोभा यांच्यावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यावर शोभाने आत्मरक्षणासाठी चाकूचा वापर केला, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे, असे पोलिसांनी सांगितले.
सदर तरुणाचे तरुणीवर गेल्या दीड वर्षांपासून प्रेम होते. आपला जुना प्रियकर याचठिकाणी असल्याचे तरुणीला माहीत नव्हते. मंजू असे हल्ला केलेल्या युवकाचे नाव आनंद नामक युवकावर त्याने हल्ला केला आहे. त्याने या आधीही दोनवेळा आपल्यावर हल्ला केल्याचे आनंदने सांगितले. ही घटना गोकाक पोलीस ठाण्यात घडली असून सध्या दोघांवर बेळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
0 Comments