बेळगाव : येळ्ळूर येथील मराठी मॉडेल शाळा  येथे आज सकाळी श्री योग वेदांत सेवा समिती वडगाव बेळगाव यांच्यावतीने बाल संस्कार व योग शिबिर भरविण्यात आले.  विद्यार्थ्यांमध्ये चांगले संस्कार घडावेत त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकासाबरोबर शारीरिक विकास आणि मानसिक विकास व्हावा या हेतूने योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या योग शिबिरामध्ये योग समितीचे सदस्य श्री संजय घोरपडे, श्री. दिनेश पाटील, श्री.अनिल मोदकेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि योगाची  प्रात्यक्षिके दाखविली. या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी योगासने करून बालसंस्काराचे धडे घेतले. यावेळी शाळेचे सर्व विद्यार्थी, मुख्याध्यापक,सर्व शिक्षक, शिक्षिका तसेच शाळा सुधारणा समितीचे सर्व सदस्य, सदस्या उपस्थित होते.