बेळगाव / प्रतिनिधी 

सोमवार दिनांक ९ डिसेंबर पासून जळगाव विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. हिवाळी अधिवेशनासाठी राज्याच्या विविध भागातून तब्बल सहा हजार ‌ पोलिसांची कुमक मागविण्यात आली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी राज्याच्या विविध भागातून येणाऱ्या पोलिसांसाठी सुवर्णसौध नजीक पोलीस टाऊनशिप उभारण्यात आली आहे. पोलीस टाऊनशिपमध्ये 500 पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

अधिवेशन काळात बंदोबस्तात गुंतलेल्या पोलिसांच्या व्यवस्थेबाबत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, पोलीस आयुक्त याडा मार्टिन तसेच जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर गुळेद जातीने लक्ष देत आहे.

जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त आणि जिल्हा पोलीस प्रमुखांनी पोलीस टाउनला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी स्वतः गादीवर झोपून तेथील व्यवस्थेच्या प्रत्येक तपशीलाचे निरीक्षण केले आणि त्यांचे मूल्यांकन केले.